कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमीत्य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्या हस्ते व संचालक यांच्या उपस्थितीत स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो उर्फ वसंत खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. यु. व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुंरबेकर,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते