संभाजी ब्रिगेडच्या शाहूवाडी तालुकाध्यक्षपदी प्रविण पाटील

Spread the love


  कोल्हापूर • प्रतिनिधी
     संभाजी ब्रिगेडच्या शाहूवाडी तालुकाध्यक्षपदी पिशवी गावचे सुपुत्र प्रविण पांडुरंग पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे – पाटील यांनी प्रविण पाटील यांना नियुक्तीचे पत्र दिले.
    प्रविण पाटील यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असतो. त्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे.कोरोना व लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी अर्ज दिले.पिशवी हायस्कूलमध्ये निर्भया पथक मार्गदर्शन शिबीर आयोजित केले. लॉकडाऊन काळात माणुसकीच्या नात्याने गरजूंना मदतीचा हात दिला. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!