राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग संघटक सचिवपदी संदीप कांबळे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     वाकरे (ता.करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप कृष्णात कांबळे यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग (ग्रामीण) जिल्हा संघटक सचिवपदी निवड झाली आहे.  
     राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध सेल व संघटना कार्यकारिणी निवड नुकतीच राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या मान्यतेने या सर्व निवड राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निवड कार्यक्रम झाला.
    वाकरे येथील संदिप कांबळे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांची सामाजिक न्याय विभाग (ग्रामीण) जिल्हा संघटक सचिवपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांचे विशेष सहकार्य लाभले. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखालील ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेश या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून सक्षमपणे संदीप कांबळे हे जबाबदारी पार पाडत आहेत.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!