संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र पायमल

Spread the love
Attachments

• सुनिल देसाई यांची प्रतिनिधी म्हणून निवड
कोल्हापूर • प्रतिनिधी
    कोल्हापूर शहर (उत्तर) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र हरिभाऊ पायमल यांची निवड करण्यात आली आहे.
     कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या शिफारसीनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित करण्याबाबत कळविले. यानुसार जिल्हाधिकारी देसाई यांनी समिती जाहिर केली. समितीमध्ये आमदार जाधव यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रीय कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्याना संधी दिलेली आहे.
     निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या आदीचे सामाजिक अन्यायापासून संरक्षण करून, त्यांना आधार देण्याचे काम  संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य करतील, असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.
               समिती अशी…….
     अध्यक्ष : नरेंद्र हरिभाऊ पायमल,
सदस्य : अनुसूचित जाती-जमाती अशासकीय प्रतिनिधी – अमोल राजेंद्र कांबळे, महिला अशासकीय प्रतिनिधी- सौ. चंदा संतोष बेलेकर, इतर मागासवर्गीय / विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी- रफिक हरूण शेख व सागर दिलीप पोवार, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी- शशिकांत रामचंद्र बिडकर, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी- दिपाली आकाश शिंदे, स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी- मिलींद केरबा वावरे, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती अशासकीय प्रतिनिधी- विशाल शिवाजीराव चव्हाण, जेष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी- सुनिल नानासाहेब देसाई.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!