दक्षिण’मधील ५३३ गरजूंना संजय गांधी योजनेतून पुन्हा पेन्शन सुरू

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय गांधी निराधार योजनेमधून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील  ५३३ गरजूंना पुन्हा पेन्शन सुरू करण्यात आली आहे. यापुढे सर्व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.  या योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना  अजिंक्यतारा कार्यालय येथे मंजुरी पत्रांचे वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
     आ. ऋतुराज पाटील पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी निराधार नागरिकांच्या पेन्शन योजनेचा प्रश्न हाती घेतला होता. गेल्या वर्षभरामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष आणि  सदस्य नियुक्ती करून या कामाला चालना दिली. समितीच्या सदस्यांशी सतत संपर्क ठेऊन त्यांच्या माध्यमातून काम केले. यामुळे गरजू आणि पात्र लोकांचा यामध्ये समावेश झाला. जानेवारीमध्ये १७३ फेब्रुवारीमध्ये १५५ आणि मार्चमध्ये २०५ लाभार्थ्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्यात आली आहे.
     कोरोनाच्या या काळात योजना तळागाळात पोचविणे हे आव्हान असतांना समिती सदस्य या योजना गरजूपर्यंत पोचवत आहेत. शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोचतील यासाठी माझा प्रयत्न  असणार आहे, असेही आ.पाटील यांनी सांगितले.
     संजय गांधी योजना समिती दक्षिणचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, आ. ऋतुराज पाटील हे सातत्याने या कामासाठी पाठपुरावा करत आहे. आहेत. त्यामुळे आमचीसुद्धा जबाबदारी वाढली आहे. यावेळी समिती सदस्य संतोष कांबळे, शिवाजी राजिगरे, संगिता चक्रे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!