कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत ज्युनिअर कॉलेजचे प्रा.ईश्वर मारुती कुऱ्हाडे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सप्टेंबर २०२१ राज्य पात्रता (सेट) परीक्षेत उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
प्रा.ईश्वर कुऱ्हाडे यांचे यश म्हणजे संजय घोडावत ज्युनिअर कॉलेजच्या यशस्वी वाटचालीतील आणखी एक मानाचा तुरा आहे.
प्रा. कुऱ्हाडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चंदगड तालुक्यातून झाले. तर पदवी शिक्षण त्यांनी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर व पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र अधिविभागातून पूर्ण केले. प्रा.कुऱ्हाडे हे संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये २०१६ सालापासून कार्यरत असून त्यांनी भूगोल विषयांसाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे.
प्रा. कुऱ्हाडे यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक प्रा.वासू सर, झोनल हेड प्रा. श्रीधर गुप्ता, प्राचार्या सौ.चैताली गुगरी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.