संजय घोडावत पॉलिटेक्नीकचा एमएसबीटीई परीक्षेत उच्चांकी निकाल

Spread the love

• ६५ विद्यार्थ्यांनी मिळविले ९० टक्केहुन अधिक गुण
कोल्हापूर • प्रतिनिधी
      दरवर्षीप्रमाणे संजय घोडावत पॉलिटेक्नीकने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. हिवाळी २०२१ परीक्षेत ६५ विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुणांपुढे मार्क्स मिळवून गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. याचबरोबर ४९ विद्यार्थ्यांनी विविध विषयामध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत १०० पैकी १०० गुण मिळवीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
      यामध्ये तृतीय वर्षातून केदार दिंडे (सिव्हिल इंजि. ९९.४०%), द्वितीय वर्षातून गौरी पाटील (इले. इंजि. ९६.७५%), प्रथम वर्षातून निरंजन कुडाळकर ( कॉम्प्यु. इंजि. ९४.५७%), गुण मिळवून इन्स्टिटयूटमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तृतीय वर्षातून केदार दिंडे (सिव्हिल इंजि. ९९.४०%), संकेत जाधव ( कॉम्प्यु. इंजि ९६.६६%), समृद्धी लवटे (ईटीसी ९५.३७%), चिन्मय पाटील (मेकॅ.इंजि  ९४.१९%), राजलक्ष्मी मांडवेकर (इले. इंजि.९४% ), गुण मिळवून शाखानिहाय प्रथम क्रमांक मिळविला आहे.
      द्वितीय वर्षातून गौरी पाटील (इले. इंजि. ९६.७५%), आकांक्षा चोडणकर (कॉम्प्यु. इंजि ९६%), तुषार घुगरे (ईटीसी ९२.५९% ), वीरेंद्र भोसले ( मेकॅ.इंजि ९२.४२%), श्रुष्टी काटकर (सिव्हिल इंजि.९२.३३%) गुण मिळवून शाखानिहाय प्रथम क्रमांक मिळविला आहे.
      प्रथम वर्षातून निरंजन कुडाळकर ( कॉम्प्यु. इंजि. ९४.५७%), अमी मेंडपारा (सिव्हिल इंजि ९२.२९%), अथर्व सावंत (मेकॅ.इंजि ८९.८६%), हर्षवर्धन पाटील ( इले. इंजि. ८९.४३ % ), श्रीवर्धन पाटील (ईटीसी ८९.% ) गुण मिळवून शाखानिहाय प्रथम क्रमांक मिळविला आहे.
      या निकालाबद्दल प्राचार्य विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त केली तसेच या यशाचे श्रेय सर्व विद्यार्थी व स्टाफ यांना देऊन पालकांचे ही कौतुक केले.
      घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!