संजय घोडावत पॉलिटेक्निकचा एमएसबीटीई परीक्षेत उच्चांकी निकाल

Spread the love


• ६५ विद्यार्थ्यांनी मिळविले ९० टक्केहून अधिक गुण

कोल्हापूर • प्रतिनिधी
      संजय घोडावत पॉलिटेक्निकने एमएसबीटीई परीक्षेत आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. उन्हाळी २०२१ परीक्षेत ६५ विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुणांपुढे मार्क्स मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
      या परीक्षेत ३० विद्यार्थ्यांनी विविध विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून त्या त्या विषयामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
     तृतीय वर्षातून मानसी ओऊळकर  (९९ % सिव्हिल इंजि ), यश कलवाडिया (९७.८२% कॉम्प्यु. इंजि ), शिवानी कदम (९६.५९%, ईटीसी), उमेश उमराणी (९४.५०%, इले.इंजि), अजयकुमार भाटले (९४.३६%, मेकॅ.इंजि) यांनी गुण मिळवून शाखानिहाय प्रथम क्रमांकाने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
     द्वितीय वर्षातून केदार दिंडे  (९८.३८ % सिव्हिल इंजि ), समृद्धी लवटे (९३.५६%, ईटीसी), अभिषेक पाटील (९३.३३ % कॉम्प्यु. इंजि ), श्रीया मनोली (८८.६७ %, इले.इंजि), चिन्मय पाटील (८८.६३ %, मेकॅ.इंजि) यांनी गुण मिळवून शाखानिहाय प्रथम क्रमांकाने घवघवीत यश संपादन केले आहे.
     प्रथम वर्षातून गुंजन करेकर (९७.३८ % कॉम्प्यु. इंजि ), शुभदा रेडेकर (९०.६३ %, इले.इंजि), श्रेया भोसले (९०.५३ %, मेकॅ.इंजि),  सुजल मकोटे (८६.३८%, ईटीसी), सृष्टी काटकर (८६.२१ % सिव्हिल इंजि ), यांनी गुण मिळवून शाखानिहाय प्रथम क्रमांकाने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
     या निकालाबद्दल प्राचार्य विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त केली. तसेच या यशाचे श्रेय सर्व विद्यार्थी व स्टाफ यांना देऊन पालकांचेही कौतुक केले.
     घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

 Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!