• आदित्य रसाळ ७०७ गुणांसह देशात ४८वा
कोल्हापूर • प्रतिनिधी
जेईई, सीईटी, नीट व एम्स या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा जपणारी संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या २८ विद्यार्थ्यांनी नीट -२०२१ या परीक्षेत ६०० गुणांच्यावरती गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. अकॅडमीच्या आदित्य रसाळ या विद्यार्थ्यांने या परीक्षेत ७२० पैकी ७०७ गुण मिळवून देशात ४८ वा क्रमांक पटकाविला आहे. तसेच कसनुर शेख-६७९ (देशात १००३वी), मल्हार देशपांडे- ६७३ (देशात १३९९ वा), धनराज पाटील- ६७१ (देशात १५०९वा) गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
याचबरोबर ७०० गुणांच्या वरती १ विद्यार्थी, ६७० गुणांच्या वरती ४ विद्यार्थी, ६५० गुणांच्या वरती ६ विद्यार्थी, ६०० गुणांच्या वरती २८ विद्यार्थी, ५५० गुणांच्या वरती ४७ विद्यार्थी तर ५०० गुणांच्या वरती ७२ विद्यार्थ्यांनी गुण संपादन करून नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले आहे.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी अकॅडमीचे संचालक श्री.वासू , त्यांची टीम व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, अकॅडमीचा हा निकाल आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. हा निकाल विद्यार्थी, संचालक श्री.वासू व त्यांची पूर्ण टीम यांनी घेतलेल्या कष्ठाचे फलित आहे. अकॅडमीने उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे.
श्री. वासू म्हणाले की, अकॅडमीने आजवर उच्चांकी निकालाच्या जोरावर पालकांचा व विद्यार्थ्यांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत व स्टाफने दिलेले योगदान याच्या जोरावरच हे यश संपादन झाले आहे. यापुढेही या अकॅडमीची यशस्वी वाटचाल चालू राहील. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.
विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, संचालक श्री. वासू व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.