संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीचे जेईई मेन्स अंतिम परीक्षेत यश

• ९९.५ %च्यावरती १५ तर ९९ च्यावरती २३ विद्यार्थी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     जेईई, सीईटी, एम्स व नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या २३ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स-२०२१ अंतिम परीक्षेत ९९ पर्सेन्टाइल च्यावरती गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
     अकॅडमीच्या विपुल पाटील- ९९.९३, संकेत बाबर- ९९.८३, प्रतीक निकम- ९९.८०, सिद्धांत सौदत्ती- ९९.७९, कृष्णा बलदवा- ९९.७७, आदित्य देशपांडे- ९९.७६ , माधव कदम- ९९.७४, हर्षवर्धन भोसले- ९९.७३, सिद्धांत मगदूम- ९९.७२, सिद्धार्थ शाह- ९९.७२, वेदांत भंडारे- ९९.६९, पलाश जोशी- ९९.६६, प्रणव मगदूम- ९९.६५,ओंकार चव्हाण- ९९.५९, केदार चौगुले- ९९.५४ पर्सेन्टाइल गुण  प्राप्त दैदिप्यमान यश संपादन केले आहे. यामध्ये विपुल पाटील याने फिजिक्स व मॅथेमॅटिक्स, प्रणव मगदूम याने फिजिक्स, माधव कदम याने मॅथेमॅटिक्स तर प्रतीक निकम याने फिजिक्स विषयामध्ये १०० पर्सेन्टाइल मिळून देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
     संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी ही सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, संचालक श्री वासू सर व त्यांची पूर्ण टीम यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                                ———
     आयुष्यात ध्येय निश्चित करून आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर कोणतेही यश सहज प्राप्त करू शकतो हे या विद्यार्थ्यांनी आपल्या निकालावरून दाखवून दिले. आमच्या अकॅडमीचे ९९ पर्सेन्टाइलच्यावरती २३ विद्यार्थी आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापुढेही  होणाऱ्या जेईई मेन्स तसेच ॲडव्हान्स परीक्षेतही या अकॅडमीचे विद्यार्थी चमकतील असे संचालक श्री शाहू सर यांनी सांगितले. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *