संजय घोडावत पॉलिटेक्निकचा ”एनबीए मानांकन”ने गौरव


कोल्हापूर • प्रतिनिधी
     अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी सर्वोच्च व प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रीडेशन अर्थातच एनबीए , नवी दिल्ली समितीकडून २०१८ साली संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या सर्व शाखांना एनबीए मानांकन प्राप्त झाले होते. हे मानांकन तीन वर्षासाठी मिळाले होते. त्यानंतर पॉलिटेक्निकने पुनर्रमानांकनासाठी एनबीए समितीकडे अर्ज सादर केला होता. एनबीए समितीकडून दि.१० ऑगस्ट रोजी इथून पुढे एक वर्षासाठी सर्व शाखांना एनबीए मानांकन मिळाल्याचे पत्र मिळाले.
     अवघ्या ६ वर्षाच्या कालावधीत एनबीएकडून सर्व शाखांना मानांकन प्राप्त झालेली संजय घोडावत पॉलीटेक्नीक ही महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजि, सिव्हिल इंजि, इलेक्ट्रिकल इंजि, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजि आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनीरिंग या शाखांना एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे.
      एनबीए समितीने सर्व शैक्षणिक कामकाज, भौतिक सुविधा व कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करून मानांकन दिले आहे. या समितीने प्रामुख्याने टिचिंग लर्निंग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट्स फीडबॅक, आऊट कम बेस्ड एज्युकेशन, सीओ-पीओ मॅपिंग, प्लेसमेंट, कॉमन फॅसिलिटी अशा विविध गोष्टींचे निकष तपासले.
      या आधीही संजय घोडावत पॉलीटेक्नीकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून ‘इलेक्ट्रिकल मशीन” लॅबला महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाची लॅब म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. याचबरोबर टुडे रिसर्च अँड रेटिंग्स, नवी दिल्ली या संस्थेमार्फत ”बेस्ट अपकमिंग पॉलीटेक्निक इन महाराष्ट्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून सर्व शाखांना ”उत्कृष्ट दर्जा” ही मिळाला आहे. तसेच क्नॉलेज रिव्ह्यू मासिकाकडून ” भारतातील टॉप टेन पॉलीटेक्निक मधील एक पॉलीटेक्निक” म्हणून गौरविण्यात आले आहे.
      पॉलीटेक्नीकचे प्राचार्य विराट गिरी यावेळी म्हणाले की, ”या यशापाठीमागे मॅनेजमेंट , सर्व स्टाफ, विद्यार्थी,पालक यांचे पाठबळ मिळाले आहे. आम्ही सर्वांनी टीममध्ये काम केले असून हे यश त्याचेच फलित आहे. या मानांकनामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. मूल्यांकनासाठी सर्वांचे सहकार्य लाभले, त्या प्रत्येक घटकाचा मी आभारी आहे.”
      विश्वस्त विनायक भोसले म्हणाले की, ”संजय घोडावत यांनी प्राचार्य विराट गिरी यांच्यावर दाखविलेला विश्वास त्यांनी खऱ्या अर्थाने सार्थ ठरविला आहे. गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य ही संस्था करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. हे यश पॉलीटेक्नीकच्या प्रत्येक घटकाचे आहे”.
      सदरचे मूल्यांकन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे एनबीए समन्वयक प्रा. नरेश कांबळे, सर्व विभागाचे एनबीए समन्वयक, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत , विश्वस्त विनायक भोसले यांनी याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
——————————————————-
 Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *