तपोवन येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत संकल्प सभा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची शनिवारी (दि.२३) कोल्हापुरात संकल्प सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता येथील तपोवन मैदानावर सायंकाळी पाच वाजता या संकल्प सभेने होणार आहे. या सभेला राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेतेमंडळी, खासदार, आमदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
       या सभेच्या माध्यमातून शरद पवार कोल्हापुरातून विरोधकांना करारा जवाब देणार आहेत. सभेच्या तयारीचा आढावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील,  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, राजेश लाटकर, आदिल फरास, विनायक फाळके, उत्तम कोराणे आदींनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!