• आदर्श सहेली मंच व निसर्ग मित्र संस्था आयोजक
कोल्हापूर • प्रतिनिधी
मकर संक्रांतीनिमित्त सर्व निसर्गप्रेमींसाठी आदर्श सहेली मंच व निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने १५ व १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत २८२३/४८ बी वॉर्ड महालक्ष्मीनगर, कमर्शियल बँकेच्यासमोर, कोल्हापूर येथे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कळसुबाई महिला संस्थेच्या सहकार्याने विविध पालेभाज्या व फळभाज्या यांचे देशी बियाणे तसेच भोपळा, गोकर्ण, गुळवेल,गवती चहा, कोकणी मिरची व कडधान्यांच्या बिया आणि वनस्पतीजन्य रंग देणाऱ्या शेंद्रीच्या बिया यांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.
रविवारी (दि.१६) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भारतीय सण पर्यावरण पूरक साजरे करावेत, दैनंदिन जीवनामध्ये सौर ऊर्जेचा वापर व तांबड्या भोपळ्याचे महत्व आणि पाककृती याविषयी ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले आहे. यामध्ये तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कृतिशील उपक्रमास निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. ऑनलाईन कार्यक्रमाची लिंक अगोदर ‘व्हाट्सअप’ला पाठवली जाईल.