संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले.
      कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पाचे व्यवस्थापक गौतम पाटील व त्यांच्या पत्नी सौ . सुमन यांच्या हस्ते पूजा बांधण्यात आली.
   यावेळी अध्यक्ष श्री. मुश्रीफ म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दर देण्यामध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना नेहमीच अग्रेसर राहील. कारखाना नवीन असूनही कमी कालावधीत प्रस्थापित कारखान्यांशी स्पर्धा करीत चांगला दर दिला आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व आर्थिक स्थिरतेसाठी कारखान्याने ऊस विकासाच्या विविध योजना राबविल्या आहेत. या योजना यापुढेही कायम राहतील, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा . शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याकडे गळीतासाठी पाठवावा, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.
      प्रास्ताविकात कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे म्हणाले, या हंगामात दररोज सहा हजार टनांच्या वर गाळप करून दैनंदिन साखर उतारा अकराच्या पुढे व सरासरी साखर उतारा बाराच्या पुढे राहील, अशी अपेक्षा आहे.  डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी आभार मानले.
  यावेळी चिफ केमिस्ट मिलिंद चव्हाण, चिफ इंजिनियर हुसेन नदाफ, मुख्य शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे, ऊस विकास अधिकारी उत्तम परीट, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक संतोष वाळके, तोडणी वाहतूक व्यवस्थापक एम. एस. इनामदार आदी प्रमुख उपस्थित होते.
 Attachments area

One thought on “संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

  1. अभिनंदन व शुभेच्छा …..वावर हाय तर पावर हाय 👍💐💐💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *