संताजी घोरपडे साखर कारखान्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथे शनिवारी (दि.५) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये “जागतिक पर्यावरण दिन” उत्साहात साजरा झाला. कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अथक प्रयत्नातून कारखान्याची निर्मिती झाली असून कारखान्याच्या सुरुवातीपासून पर्यावरणास प्राधान्य देऊन प्रत्येकवर्षी कारखाना परिसरात झाडे लावून पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो.
     कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक नविद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साजरा झाला. कारखाना परिसरात विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी दोन हजार झाडे लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. तसेच पर्यावरणपूरक वृक्षांची लागवडही करण्यात आली.
      कारखान्याचे  जनरल मॅनेजर  संजय शामराव घाटगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनीअर हुसेन नदाफ, शेती अधिकारी प्रतापराव  मोरबाळे, डिस्टीलरी मॅनेजर संतोष मोरबाळे, चिक केमिस्ट मिलिंद  चव्हाण, ऊस विकास अधिकारी उत्तम परीट, पर्यावरण अधिकारी बाळासो टिपुगडे व सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!