महापालिकेच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस प्रतिमेस प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
      यावेळी राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकतेची शपथ दिली. यामध्ये राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यसाठी देखील भरीव प्रयत्न करीन, ही शपथ देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत असून सरदार वल्लभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे ती राखणे शक्य झाले आहे. तसेच माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सुध्दा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे अशी शपथ घेण्यात आली.
      यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, संजय भोसले, तुषार भरसट, राजेंद्र जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *