डीवायपी साळोखेनगरतर्फे ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षा

Spread the love

• १२ फेब्रुवारीला राज्यस्तरीय परीक्षा ५० हजारांची बक्षीसे
कोल्हापूर • प्रतिनिधी
     साळोखेनगर येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये १२वीच्या विध्यार्थ्यांसाठी शनिवार १२ फेब्रुवारी रोजी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विदयार्थ्यांना एकूण ५० हजार रुपयांची बक्षिसे मिळणार असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी दिली.
     यावेळी कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने म्हणाले, संस्थेचे उपाध्यक्ष व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून या परिक्षेची सुरवात झाली आहे. सध्याच्या संगणक युगात गणित या विषयाला महत्व आले असून आयटी क्षेत्र असेल किंवा सध्याचे डेटा सायन्स अथवा मशीन लर्निंग सारखे नवीन क्षेत्र असो यामध्ये गणिताला महत्वाचे स्थान आहे. या संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ व्हावा व गणित या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भीती, त्याबाबतचा न्यूनगंड कमी होऊन विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून आम्ही या परीक्षेचे आयोजन करत आहोत. 
      संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ऑब्जेक्टीव्ह पद्धतीने होणाऱ्या १०० गुणांच्या या परीक्षेत ५० प्रश्न असतील. यामध्ये प्रामुख्याने MHT-CET च्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा CET परीक्षेचासुद्धा सराव होणार आहे.
      या परीक्षेचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे २५०००,१५००० व १०००० अशी बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना ई-सर्टिफिकेट दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन coes.dypgroup.edu.in व प्रत्यक्ष महाविद्यालयात अशा पध्दतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!