सतीश पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी सतीश शिवाजी पाटील यांना शिवाजी विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी पदवी प्राप्त झाली. 
     ”टेम्प्लेट फ्री सिंथेसिस ऑफ मल्टीनॅरी नॅनो क्रिस्टलाइन मेटल चाल्कोजेनाईड थीन फिल्म्स व्हाया हैड्रोथेर्मल रूट फॉर एफिशियंट सोलर सेल अँप्लिकेशन” हा त्यांच्या पीएच.डी चा मुख्य विषय होता. सतीश पाटील यांना शिवाजी  विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. पी. एन. भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
     डॉ.सतीश पाटील यांचे प्राथमिक शिक्षण हे विद्यामंदिर कासारी, माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे झाले. पुढे त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठातून एमएस्सी रसायनशास्त्र विषयातून पूर्ण केले. यानंतर त्यांनी मुंबई येथे फार्मासिटिकल कंपनीमध्ये नोकरी केली. दरम्यानच्या काळात त्यांनी पीएचडीसाठी अर्ज सादर केला. यांनतर २०२१ साली शिवाजी विद्यापीठातून आपले पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
     डॉ.सतीश पाटील यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये २१ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!