कोल्हापूर • प्रतिनिधी
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती ,कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र.११ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती उत्साहात साजरी झाली.
शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील व शाळेच्या सेविका मंगल मोरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजचा दिवस ‘ बालिका दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. तसेच महिला शिक्षक दिन म्हणूनही साजरा केला जातो. यावेळी मंगल मोरे यांचा व नंदिनी कांबळे यांचा आदर्श परिपाठचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
केंद्र मुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांना आदर्श परिपाठचे पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी सोशल डिस्टनसचे नियम पाळून कार्यक्रम शिस्तबद्ध करण्यात आला.आभार ऋतुराज कोरवी यांनी मानले