शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सध्या राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोल्हापूर शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशान्वये शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये (सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम)  व खाजगी कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश उप आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिले आहेत.  
       बंद कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे आहे. त्याचबरोबर ईयत्ता १०वी १२वी चे वर्ग कोवीड-१९ नियमाचे पालन करुन बोर्ड परिक्षा होईपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच सर्व शिक्षक/शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाचे परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचे नाही, जेणेकरुन आकस्मित प्रसंगी शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तात्काळ कोरोना कामकाजावर हजर राहता येईल. यासाठी संबंधितांना आदेश दिलेले आहेत.
      तसेच शहरातील खाजगी कोचिंग क्लासेसमधील सर्व शिक्षक/शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी कोवीड-१९ RTPCR चाचणी व लसीकरण करुण घेणे बंधनकारक आहे. जर यामध्ये कोणतीही कसूरी झाल्यास संबंधितांवर प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे आवाहन उप आयुक्त रविकांत आडसूळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!