शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात


कोल्हापूर • प्रतिनिधी
    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने “स्वच्छता अभियान” या विषयावर शहरस्तरीय शाळातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत महापालिकेच्या ३५ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
    महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची सोय केली आहे. विद्यार्थ्यांना घरी अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, म्हणून या भाषण स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे आयोजन महापालिकेच्या राजर्षि शाहू विद्यामंदिर शाळा क्र.११ कसबा बावडा येथील शाळेचे केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी संयोजन केले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर संजय मोहिते,स्थायी समिती सभापती सचिन पाटील,शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रशासन अधिकारी एस.के. यादव, शैक्षणिक पर्यवक्षेक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई  यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
    शहरस्तरीय भव्य ऑनलाईन भाषण स्पर्धा ” या उपक्रमात सर्वच स्पर्धकांनी प्रयत्नांची शिकस्त करून  ” महात्मा गांधीजींचे स्वच्छताविषयक विचार ” या विषयावर मुद्देसूद भाषण सादर करून पुढील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
लहान गट : प्रथम क्रमांक – सोनाक्षी सोनाप्पा गावडे म.न.पा.टेंबलाईवाडी विद्यालय, द्वितीय क्रमांक – अर्णव सुकेश पाटील म.न.पा.प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी, तृतीय क्रमांक – 
यश सिध्दीविनायक बन्ने लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर.
    मोठा गट :प्रथम क्रमांक – देवयानी  हेमंत  बेर्डे म. न.पा.यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर , द्वितीय क्रमांक – वेदांत सूकेश पाटील म.न.पा.प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी,तृतीय क्रमांक – भार्गव गोपाळकृष्ण पोतदार वि.स. खांडेकर विद्यालय .
   परिक्षक म्हणून तमेजा मुजावर, शिवशंभु गाटे,  विद्या पाटील, आस्मा तांबोळी यांनी काम पाहिले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे शहराध्यक्ष मनोहर सरगर,राजेंद्र पाटील, दिलीप माने,वैशाली पाटील, हेमंत पाटोळे, सुजाता आवटी हे उपस्थित होते. 

One thought on “शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भाषण स्पर्धा उत्साहात

  1. विद्यार्थ्यांना खूपच छान आपल्या बातमीद्वारे प्रसिद्धी दिल्याबद्दल खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा आपला मित्र
    अजितकुमार पाटील, कोल्हापूर💐💐💐💐💐💐👌👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *