महानगरपालिका अग्निशमन विभागाची शोध व बचावाची प्रात्यक्षिके


कोल्हापूर • प्रतिनिधी
     प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार व मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पावसाळ्यापूर्वी अग्निशमन विभागाकडून अग्निशमन, शोध व बचावबाबत पंचगंगा नदी घाट येथे प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील अत्याधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक दाखवण्यात आली.
     प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या, कोणतेही आपत्ती हि सांगून येत नाही. त्यामुळे आपत्ती येणार हे गृहित धरून महापालिका प्रशासन उपायोजना आणि नियोजन करते. याचबरोबर पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले सफाई, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक इमारतीवर कारवाई सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिन्स्टंन्सचे पालन व्हावे यासाठी स्थलांतरीत नागरिकांच्या सोईसाठी दरवर्षी पेक्षा यंदाच्यावेळी जास्त इमारतीमध्ये पूर भागातील नागरिकांचे स्थलांतरीत करण्याचे नियोजन सुरु आहे. महापालिकेच्या यत्रंणेसोबतच जीवनज्योती व जीवन आधार संस्थेकडील स्वयंसेवकही महापालिकेच्या सोबत आपत्तीकालीन परिस्थितीत काम करणार आहेत. कोणतेही आपत्ती आली तर त्याला सामना करण्यासाठी महापालिका सज्ज आहे.
     अग्निशमन विभागाकडे नव्याने दाखल झालेल्या ४ रबरी बोटीसह एकुण ९ रबरी बोटीचे पंचगंगा नदीमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच एखादा व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॉकेट, फायबर इनर व दोरच्या सहाय्याने कसे वाचवले जाते याचेही लाईव्ह प्रत्याक्षिक दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागकडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी.ए.सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रालिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टींग बॅग इत्यादी साहित्याचेही प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. लाईफलाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा याचेही प्रात्यक्षिक झाली.
     या प्रात्याक्षिकावेळी उप-आयुक्त निखील मोरे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी रणभीसे, कांता बांदेकर, मुल्ला तसेच अग्निशमन विभागाकडील जवान, जिवन ज्योत व जीवन आधार संस्थेकडील स्वयंसेवक उपस्थित होते.
———————————————–
 Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *