ई-श्रमकार्ड या क्रांतिकारी योजनेमुळे लाखो असंघटित कामगारांना सुरक्षा आणि अभय

Spread the love

• सबका साथ-सबका विकास योजना सत्यात- महाडिक
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सबका साथ आणि सबका विकास या घोषणेप्रमाणं समाजातील इतर घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार अनेकविध नावीन्यपूर्ण योजना राबवत आहे. त्याच्या जोडीला आता असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही अच्छे दिन आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. ई-श्रमकार्ड हा त्याचाच एक भाग आहे. देशातील एकही असंघटित कामगार बेरोजगार राहू नये, या हेतूने मोदी सरकारने सुरू केलेली ही योजना क्रांतिकारी आहे, असे उद्गार भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी काढले. विक्रमनगर येथे ई श्रम कार्ड वाटप उपक्रमप्रसंगी ते बोलत होते.
      असंघटित कामगारांच्या सुरक्षितेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासनानं ई-श्रमकार्ड अंतर्गत कामगारांची नोंदणी करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या योजनेमुळे देशातील असंघटित कामगारांच्या नोंदणीचा महामहोत्सव सुरू झाला आहे. शेतकरी, पशुपालक, शेतमजूर, बिडी कामगार, वृत्तपत्र विक्रेते, फळविक्रेते, हातगाडी चालक, रिक्षा चालक, घरेलू मोलकरीण, आशा वर्कर्स, बांधकाम कामगार यासह विविध घटकातील कामगारांची नोंदणी सुरु आहे. भाजपाच्या उंचगाव शाखेच्यावतीनं विक्रम नगर परिसरातील कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घेण्यात आली होती. अशा ३२०० कामगारांना ई-श्रमकार्ड वितरण करण्यात आले.
      माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कामगारांना श्रम कार्ड प्रदान करण्यात आली. केवळ पोटासाठी राबराब राबणार्‍या आणि प्रसंगी किरकोळ मजुरीसाठीही जीव धोक्यात घालणार्‍या कामगारांना पहिल्यांदाच मोदी सरकारने दिलासा आणि सुरक्षा देऊ केली आहे. ई-श्रमकार्डमुळं १८ ते ५९ वयोगटातील असंघटित कामगारांना शासकीय सुविधांचा लाभ मिळण्याबरोबरच त्यांच्या हाताला कायमस्वरूपी कामही मिळणार असल्याचं धनंजय महाडिक यांनी सांगितले. देशभरातील नागरिकांच्या प्रश्‍नांची उत्तम जाण असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घटकासाठी अत्यंत उपयुक्त योजना सुरू केली आहे. समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोदी यांची सातत्याने धडपड सुरू आहे.
      यावेळी आजम जमादार, रवींद्र मुतगी, दिलीप मैत्रानी, सुषमा गर्दे, बापू राणे, नितीन देसाई, माणिकराव बाकळे, मानसिंग पाटील, संतोष कदम, विजय सूर्यवंशी, श्रीरंग पाटील, प्रदीप पाटील, दिलीप बोंद्रे, सीमा पालकर, संगीता घोरपडे, महेश पाटील, मंगेश महाडिक, अमोल सोनुले, किरण तासगावे आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!