संजय घोडावत विद्यापीठाच्या ११ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट कंपनीमध्ये निवड

Spread the love

संजय घोडावत विद्यापीठाच्या ११ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट कंपनीमध्ये निवड
कोल्हापूर • प्रतिनिधी   
     शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या कॉम्प्युटर, इलेक्टिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन, एरोनॉटिकल व मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाच्या ११ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्यांना वार्षिक ४.५० लाखांचे पॅकेज प्राप्त झाले. विद्यापीठाने कमी कालावधीतच विविध मानांकने मिळवून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
     दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात.
     कॉग्निझंट एक प्रख्यात कंपनी असून जगभरात विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. आय टी क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील  इंजिनीरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
     या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.स्वप्निल हिरीकुडे,  ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर मकरंद जोशी व समन्वयक प्रा. पंकज गवळी, प्रा. उदय माने, डॉ. महांतेश मठद , प्रा. विकास भंडारी, प्रा.बाबू यांनी परिश्रम घेतले.
     या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन के पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!