घोडावत पॉलिटेक्निकच्या १३  विद्यार्थ्यांची एसपीसीएल इन्फोटेक कंपनीमध्ये निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीरिंगच्या ११ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागाच्या २ विद्यार्थ्यांची एसपीसीएल इन्फोटेक सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड झाली आहे.
       यामध्ये कॉम्प्युटर शाखेचे संकेत जाधव, हर्षल माळी, स्तुती मेस्त्री, अभिषेक पाटील, साक्षी पाटील, संग्राम मोहिते, अब्दुलरहमान नाईकवाडी, अनिकेत कांबळे, गणेश भोसले, प्रतीक्षा माळी, मृदुला माने आणि ईटीसी विभागाच्या मयुरा माळी आणि अभिनंदन चौगुले यांचा समावेश आहे.
       एसपीसीएल इन्फोटेक सर्व्हिसेस ही प्रख्यात कंपनी असून भारतभर विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. आय टी क्षेत्रात  या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
      या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील व फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स प्रा.भगवान पाटील व प्रा.सोनाली मलमे यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी, अकॅडमीक डीन प्रा. शुभांगी महाडिक, विभागप्रमुख प्रा.सागर चव्हाण आणि प्रा.रवींद्र धोंगडी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!