“घोडावत”च्या १८ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बँकेमध्ये निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या बँकिंग अकॅडमीमधील १८ विद्यार्थ्यांची भारतातील विविध राष्ट्रीय बँकेमध्ये निवड झाली आहे.
      सन २०२१-२२ मध्ये विविध बँकिंग क्षेत्रातील निकालामध्ये त्यांनी हे यश खेचून आणले आहे. यामध्ये गौतमकुमार, प्रणिता पाटील, विवेक सावंत, विलीना नरोरा, प्रियांका रावत, निखिल कदम, प्रणाली शिंदे, प्रथमेश पोतदार, प्रियांका वाडकर, ऋषिकेश गुरव, विशाल चौगुले, पूजा लड्ढा, शिवप्रसाद किणेकर, धनश्री बोडके, मयूर सोनावणे, अरविंद पाटील, तुषार वांजरे, कपिल जलपुरे यांचा समावेश आहे. यामध्ये गौतमकुमार यांची मागील चार महिन्यामध्ये विविध क्षेत्रात सहा पदावर निवड झाली आहे.
     संजय घोडावत बँकिंग अकॅडमीने नेहमीच उच्चांकी निकालाची परंपरा कायम जपत आजवर १०० हुन अधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत उच्च पदावर नोकरी मिळविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
विद्यार्थ्यांना ब्रँच प्रमुख प्रा.अक्षय पाटील, बँकिंग हेड प्रा. जी.एस.पवार, प्रा.अमोल पाटील, प्रा.सचिन सिल्वन, प्रा.सूर्यकांत कांबळे व भरत साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
      याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक विराट गिरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!