संजय घोडावत विद्यापीठाच्या २१ विद्यार्थ्यांची इंडियामार्ट कंपनीमध्ये निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाच्या २१ विद्यार्थ्यांची इंडियामार्ट कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज प्राप्त झाले. घोडावत विद्यापीठाने कमी कालावधीतच अनेक मानांकने मिळवून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
      दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या  ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात.
     इंडिया मार्ट एक प्रख्यात कंपनी असून जगभरात विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. ऑनलाईन विक्री व खरेदी  क्षेत्रात या कंपनीने आपला नांवलौकिक प्राप्त केला आहे.
     नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
     या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.स्वप्निल हिरीकुडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर मकरंद जोशी व फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स प्रा.रोहित लांडगे, प्रा.निकिता निल्ले यांचे सहकार्य लाभले.
     या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ.संदीप सिंग, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव, स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट च्या डीन डॉ.वाय.एल.गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!