कोल्हापूर • प्रतिनिधी शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी, मॅनेजमेंट, सायन्स शाखेतून यावर्षी २२१ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. नुकत्याच पार पडलेल्या विविध कॅम्पस ड्राईव्हमधून विद्यापीठाच्या २२१ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. यामध्ये बायजु कंपनीने सर्वात जास्त म्हणजे १० लाखाचे पॅकेज संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिले आहे. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाकडून २२१ विद्यार्थ्यांची निवड म्हणजे संस्थेच्या यशस्वी वाटचालीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामध्ये संस्थेने प्रामुख्याने अभियांत्रिकीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ,टेक महिंद्रा, एक्सेंचर, कॅपजेमिनी, पारी रोबोटिक्स, इन्फोसिस पर्सिस्टन्ट, एस ल के सॉफ्टवेअर, विप्रो, कॉग्निझंट, अटॉस सिन्टेल, हरमन, बंगलोर, दोषहीन, हेक्सावेअर, फयूरेशिया तर एमबीए साठी बर्जर पेन्ट्स, एशियन पेन्ट्स, ब्लॅक अँड व्हाईट फिन सोलुशन, एरटेल, ग्यालघर , मेट्रो अकाउंटिंग, आयडीबीआय बँक आयडीएफसी बँक व संजय घोडावत ग्रुप तसेच स्कूल ऑफ सायन्ससाठी जे सन्स, कॅलिडस लॅब, डोकिम्स लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, एजिओ फार्मा, टीयूव्ही इंडिया या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण करून दिली. संजय घोडावत विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणारी पहिलीच बॅच असून या घवघवीत यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन. के. पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.स्वप्निल हिरीकुडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर मकरंद जोशी व सर्व विभागाचे फॅकलटी कोऑर्डिनेटर्स यांनी परिश्रम घेतले. ——————————————————- Attachments areaReplyForward