
![]() | ![]() ![]() ![]() ![]() | ||
• राष्ट्रीय मानांकित टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर • प्रतिनिधी
केएसएच्या अनिष सोनटक्के, ऋषीकेश नलवडे, श्रेयस माने व विरेन पाटील यांची पॉंडेचरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय मानांकित टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धा नुकत्यात पुणे येथील हडपसरला पार पडल्या. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्यावतीने एकूण २५ खेळाडू पाठविण्यात आले होते. त्यामधील केएसएच्या अनिष सतिश सोनटक्के, श्रेयस पराग माने यांची १७ व १९ वर्षाखालील गटामध्ये व ऋषीकेश सत्यविजय नलवडे याची १९ वर्षाखालील गटात तर विरेन अभिजीत पाटील याची ११ व १३ या वयोगटांतर्गत पॉंडेचरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय मानांकित टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २० ते २६ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
अनिष, श्रेयस, ऋषीकेश व विरेन या खेळाडूंना केएसएचे पेट्रन-इन चीफ श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि सौ. मधुरिमाराजे छत्रपती, केएसए सचिव माणिक मंडलिक, ऑन. टेबल टेनिस सचिव नितीन जाधव यांचे प्रोत्साहन लाभले तर केएसएचे टेबल टेनिस कोच संग्राम चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यांना सहाय्यक प्रशिक्षक विवेक कुंभार व ओंकार गुरव यांचेही सहकार्य लाभले.