संविधान सन्मान सोहळा समितीच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून अनुप्रिया गावडेंची निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संविधान सन्मान सोहळा समिती २०२२च्या ब्रॅंड ॲंबेसिडर म्हणून अनुप्रिया गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
      इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अनुप्रिया गावडे या विद्यार्थिनीने भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावना, ३% कलमे सहा मिनिटे, दहा सेकंदात तोंड पाठ करून विश्वविक्रम प्रस्थापित केला.  तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा बालहक्क अनुसंधानआतील ५४ कलमे चार मिनिटे, अकरा सेकंदात तोंडपाठ करून विश्वविक्रम प्रस्थापित केला, वर्ल्ड बुक ऑफ लंडनसहीत १५ वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ बुकमध्ये नोंदीसह अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.
     या कार्याची दखल घेऊन रामदास आठवले प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्यावतीने तिच्या नावाची सन २०२२ च्या संविधान सन्मान सोहळ्याच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषणा करण्यात आली. तिला इंडियन कॉन्स्टिट्यूशन डे सर्टिफिकेट ऑफ होनरने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी  दिल्ली स्टेट युनिव्हर्सिटीच्या AIIPPHS च्या कुलगुरू डॉ. अंजू भंडारी, रजिस्टर के. डी. आर्या, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक (कळंबा)चे चंद्रमणी इंदुलकर यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!