घोडावत विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची विप्रो-पारी कंपनीमध्ये निवड


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित विप्रो-पारी कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजि. विभागातून अश्विनी पाटील, महेश वीर, तन्मय उपाध्ये, ईटीसी इंजि. विभागातून प्रतीक गुरव आणि इलेक्ट्रिकल इंजि. विभागातून अनिकेत देसाई या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
     घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात विविध मानांकने मिळवून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. यावर्षीही अनेक विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस ड्राईव्हमार्फत झाली आहे. याचाच एक भाग म्हणून विप्रो-पारी या प्रतिष्ठित कंपनीचा ड्राईव्ह नुकताच पार पडला. यामध्ये या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
     विप्रो-पारी या कंपनीच्या जगभरात विविध देशात शाखा आहेत. आय टी व रोबोटिक्स क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
     या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त   विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ. एम. टी. तेलसंग, प्रभारी कुलसचिव डॉ.एन. के. पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
      या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.स्वप्निल हिरीकुडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर मकरंद जोशी व समन्वयक प्रा.पंकज गवळी, प्रा.महांतेश मठद व प्रा.विकास भंडारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *