‘मंजिरी’ मराठी शॉर्ट फिल्मची कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      येथील ऐश्वर्या पाटील हिने दिग्दर्शित केलेल्या ‘मंजिरी’ या शॉर्ट फिल्मची हमिंगबर्ड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कोलकाता व कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी विविध देशांच्या फिल्म्समधून निवड झाली आहे. निवड झालेली कोल्हापूरची ‘मंजिरी’ ही एकमेव मराठी शॉर्ट फिल्म आहे. 
      ‘मंजिरी’ या शॉर्ट फिल्मची संकल्पना आणि निर्मिती ऐश्वर्या पाटील आणि ऋचिका खोत यांनी केली असून दिग्दर्शन, चित्रीकरण ऐश्वर्या पाटील हिने केले आहे. लेखन, संगीत दिग्दर्शन ऋचिका खोत हिने केले आहे. संकलन ऐश्वर्या पाटील आणि सनथ पवार यांनी केले तर पार्श्वगायन अबोली देशपांडे, ध्वनिमुद्रण अभिसार मल्टीमिडिया प्रॉडक्शन्सने केले आहे. कलाकार ऋचिका खोत आणि करण पाटील हे आहेत.
      ‘मंजिरी’ या शॉर्ट फिल्म विषयी अधिक माहिती सांगताना ऐश्वर्या पाटील म्हणाली की, मंजिरी….. फुलांचा व्यवसाय करणारी ही मंजिरी. फूलविक्रेती असली तरी तिच्यात आणि फुलांमध्ये केवळ ‘व्यवहार’ नाही, तिचं भावविश्व फुलांनी भारलेलं आहे. स्वतःच्या कामाहून खूप पलिकडे जाऊन तिचं फुलांशी नातं आहे. सौंदर्याच्या, गंधाच्या पारंपरिक कल्पनांच्या प्रभावाखाली न राहता तिला फूलन् फूल मनस्वी प्रिय आहे. प्रत्येकाचं वेगळेपण ती जाणते. त्यांचे रंग, गंध, पोत या साऱ्याचा अर्कच जणू तिच्यात उतरलाय. एका बिंदूवर ती फुलांपासून निराळी नाही. तिचं नावसुद्धा मंजिरी. मंजिरी म्हणजे तुळसफूल. दृश्यफितीमागच्या काव्यात तिच्याबद्दल बोलणारा तिचा सखा म्हणता येईल. ज्याने मंजिरीला कितीतरी काळ पाहिलं आहे. ती त्याला निसर्गाचंच एक रूप म्हणून दिसते, ती भवतालात मिसळून जाते.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!