कोल्हापूर • प्रतिनिधी
शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्युनिकेशन विभागाच्या नेहा जैन या विद्यार्थिनीची इसरो कंपनीमध्ये १ वर्षाच्या अँप्रेन्टिस प्रोग्रॅमसाठी निवड झाली आहे.
हा प्रोग्रॅम स्पेस अँप्लिकेशन सेंटर अहमदाबाद, गुजरात येथे राबवला जाणार आहे. या दरम्यान विविध टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेण्याची व लाइव्ह प्रोजेक्ट्स वर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठी मासिक स्टायपेंड देखील दिला जाणार आहे.
या प्रोग्रॅमसाठी संपूर्ण भारतातून अर्ज मागवण्यात आले होते. नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे ही निवड झाली आहे.
या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.स्वप्निल हिरीकुडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर मकरंद जोशी व कोऑर्डिनेटर्स प्रा. प्राची शिंदे यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. संदीप सिंग, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमीक डीन डॉ.उत्तम जाधव यांनी सर्वांचे अभिनंदन केले.