महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग काऊन्सीलवर सात जणांची निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेल्या ९५ वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ च्या द्विवार्षिक निवडणुकीत ‘अध्यक्षपदी’ कोल्हापूरच्या ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली असून वरिष्ठ उपाध्यक्षपदी उमेश दाशरथी (औरंगाबाद) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
      कोल्हापूर जिल्ह्यातून गव्हर्निंग काऊन्सीलवर आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रकांत जाधव, उदय लोखंडे, रमाकांत मालु, सतीश माने, संजय पाटील, धनंजय दुग्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
      ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेल’चे व्यवस्थापन समितीतील ६ पैकी ५ उमेदवार व गव्हर्निंग काऊन्सील मधील ९१ पैकी ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
      राज्यातील ५५० हुन अधिक व्यापारी, औद्योगिक संघटना तसेच चार हजारहून अधिक व्यापारी, उद्योजक चेंबरशी संलग्न असून, ५५० संलग्न सभासदांच्या माध्यमातून चेंबर राज्यातील ७ लाख व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधित्व व नेतृत्व करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!