कोल्हापूर • प्रतिनिधी
शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंगच्या सहा विद्यार्थ्यांची जाबिल कंपनीमध्ये निवड झाली आहे.
यामध्ये समृद्धी लवटे, निराली वडालिया, स्फूर्ती औरसंग, अश्विनी पाटील, आरजू मुजावर व राज सुतार यांचा समावेश आहे.
जाबिल एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.
नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील व फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स प्रा. भगवान पाटील प्रा.आकाश घस्ते, प्रा.मयुरेश पाटील, प्रा. सोनाली मलमे यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी, अकॅडमीक डीन प्रा.शुभांगी महाडिक, विभागप्रमुख प्रा. रवींद्र धोंगडी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.