कोल्हापूर • प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मास कम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी सोमदत्त देसाई याच्या “मा.ना.- द डॉक्युमेंट्री” या माहितीपटाची ‘स्वतंत्रता विज्ञान फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे गावचे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक माधव कुलकर्णी यांच्या जीवनावर हे माहितीपट आधारित आहे. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय विज्ञान प्रसार विभाग, फिल्म्स डिव्हीजन ,विज्ञान भारती आणि माहिती प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने हा फिल्म फेस्टीव्हल १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम ‘स्वतंत्रता का अमृतोत्सव’चा हा फेस्टिवल एक भाग आहे. माहितीपटाची निर्मिती सुरेश देसाई यांनी आणि चित्रीकरण व संकलन अनुक्रमे संकेत मन्नई, चेतन अरुण यांनी केली आहे.
——————————————————-