कोल्हापूर • प्रतिनिधी
शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या एम.टेक सिव्हिल शाखेच्या अनिकेत देशपांडे व सुशांत सावंत या दोन विद्यार्थ्यांची स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट प्रा.लि. मुबई या कंपनीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटर म्हणून निवड झाली आहे. त्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज प्राप्त झाले. विद्यापीठाने कमी कालावधीतच विविध मानांकने मिळवून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
स्ट्रक्टवेल एक प्रख्यात कंपनी असून सिव्हिल क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. या निवड प्रक्रियेत त्यांना एम.डी. चेतन रायकर व टेक्निकल डायरेक्टर जयंत कदम यांचे सहकार्य लाभले. तसेच विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. अमेय काटदरे व पदव्युत्तर विभाग समन्वयक प्रा.डॉ. चेतन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन के पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————————-