गोरगरीब रुग्णांची सेवा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा

Spread the love


      
• मंत्री हसन मुश्रीफ यांची धर्मदाय दवाखान्यांना समज
कोल्हापूर • प्रतिनिधी
      मुंबईसह राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयातून गोरगरीब रुग्णांची तळमळीने सेवा करा अन्यथा; कारवाईला सामोरे जा, अशी समज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गोरगरिबांच्या रुग्णसेवेतून आशीर्वाद मिळवा, असेही ते म्हणाले.
      मुंबई शहरातील सर्वच धर्मादाय दवाखान्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय समाजसेवक यांची बैठक मंत्रालयात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री दत्तामामा भरणे व आमदार उपस्थित होते. तसेच, धर्मादाय आयुक्त प्रमोद सारी सहआयुक्त प्रमोद तरारी सहआयुक्त सौ. मालवणकर, सहआयुक्त सौ. पवार याही उपस्थित होत्या.
     यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी गोरगरीब रुग्णसेवेचे चांगले काम करणाऱ्या रुग्णालयांचे बैठकीत कौतुकही केले. ते पुढे म्हणाले, गोरगरीब रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळणेबाबत कार्यवाही करा. रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या व औषधोपचारासाठी लावलेल्या जाचक अटी तातडीने रद्द करा.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!