शहरातील सात दुकाने सील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने गुरुवारी (दि.६)  जीवनावश्यक दुकाना व्यतिरिक्त सुरु असलेली सात दुकाने सील केली. कोविड-१९ आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करुन जीवनावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु केल्यास ती सील करण्याची कारवाई परवाना विभागामार्फत सुरु आहे.
      कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता काही दुकानदारांनी आपला व्यवसाय चालू ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे परवाना विभागाने लक्ष्मीपुरी येथील गुंदेशा इलेक्ट्रिक गोडावून, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आहुजा दुकान, वणकुद्रे भांडी दुकान, पद्मा टॉकीज येथील वजनमापे दुकान, लक्ष्मीरोड येथील रियल बॉईज दुकान, मॅजिक कलेक्शन, महावीर कॉलेज चौक येथील सदगुरु टुर्स ॲण्ड झेरॉक्स दुकानांवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.
     या विभागाने आजअखेर एकूण २० दुकानांवर सीलबंदची कारवाई केली आहे. तरी परवाना विभागाच्यावतीने येथून पुढेही अशी जीवनावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने सुरु राहिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तरी शहरातील सर्व व्यवसायधारकांनी कोविड-१९ च्या शासन निर्देशांचे पालन करुन कायदेशीर कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. सदर कारवाईत इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक रामचंद्र काटकर, निरीक्षक रविंद्र पोवार, सहा.आरोग्य निरीक्षक गीता लखन, निलेश कदम, दिलीप कदम व कर्मचारी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!