शिवाजी विद्यापीठात शहिद दिन

Spread the love


  कोल्हापूर • प्रतिनिधी
       शिवाजी विद्यापीठात आज शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
      कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते शहिदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनीही शहिदांच्या प्रतिमांना पुष्प वाहून आदरांजली व्यक्त केली.
       यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!