संजय घोडावत विद्यापीठामध्ये शाहू महाराज जयंती उत्साहात


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ. एम. टी.तेलसंग, प्रभारी कुलसचिव डॉ. एन. के. पाटील संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, प्राचार्य विराट गिरी, सर्व डीन, विभागप्रमुख तसेच सर्व स्टाफ आदी उपस्थित होते.
     यावेळी विश्वस्त विनायक भोसले यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याबद्दल अभिमान व्यक्त करीत उपस्थितांना महाराजांच्या व्यक्तीरेखेचे विविध पैलू उलगडून सांगितले.
      संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य सध्याच्या पिढीला प्रेरणादायी आहे व यासाठीच त्यांच्या जीवनचरित्रावर आम्ही निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि या स्पर्धेसाठी ५०० हुन अधिकानी आपला सहभाग नोंदविला, अशी माहिती उपस्थितांना दिली.
      स्कुल ऑफ लिबरल आर्टस्चे डीन डॉ. उत्तम जाधव यांनी छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनपट स्पष्ट करीत त्यांच्या अनेक पैलूवरती प्रकाशझोत टाकला.यानंतर प्रा. बसवराज पुजारी व प्रा. आलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
      याबाबत बोलताना अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले ”राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्याची संकल्पना राबविली. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा पायाही घातला. याचबरोबर शिक्षणानेच मनुष्य समृद्ध बनतो म्हणून गोरगरीब जनता शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना पाठबळ दिले. शाहू महाराज यांच्या सामाजिक प्रबोधनाची परंपरा आपण सर्वानी जपायला हवी.”
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *