शाहूवाडी तालुक्यातून पंचगंगा स्मशानभूमीस ५० हजार शेणी व २० टन लाकूड

• शाहूवाडी तालुक्यातील छत्रपती मालोजीराजे ग्रुपच्या सहकार्याने
कोल्हापूर • प्रतिनिधी
     शाहूवाडी तालुक्यातून महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस ५० हजार शेणी व २० टन लाकूड देण्यात आले आहे.
     पेरीड गावचे माजी वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेणी व लाकूड गावोगावी जाऊन गोळा करण्यात आले. या शेणी व लाकूड शाहूवाडी येथून आणण्यासाठी घाटगे पाटील ट्रान्स्पोर्टचे तेजस घाटगे यांनी पाच ट्रक उपलब्ध करुन दिले.
     कोरोना बाधितांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन शाहूवाडी तालुक्याने स्मशानभूमीस शेणी व लाकूड दिले आहे.
      माजी वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाजीराव पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यातील छत्रपती मालोजीराजे ग्रुप यांच्या सहकार्याने अंत्यविधीसाठी लागणाऱ्या शेणी व लाकूड स्मशानभूमीस देण्याचे आवाहन तालुक्यातील गावोगावी जाऊन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शाहूवाडी तालुक्यातील  शिराळा, खेडे,  सोंडोली, थावडे, जांबूर, मालगाव, विरळे पळसवडे, मालेवाडी, गोंडोलो, रेठरे,केर्ले, घोळसवडे, वारूळ, वालूर अवतूर, येलूरग्रूप ग्रामपंचायत, शिरगाव,  पेरीड, गाडेवाडी व नरहर तरुण मंडळ मलकापूरमधील माता-भगिनी व बंधू तसेच ग्रामस्थ यांनी उदंड असा प्रतिसाद देत सुमारे ५० हजार शेणी व २० टन लाकूड जमा करून दिले. सदरचे साहित्य घाडगे पाटील यांच्या ट्रकमधून पंचगंगा स्मशानभूमीमध्ये  देण्यात आले.
     यासाठी माजी वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाजीराव पाटील, राष्ट्रीय पैलवान रंगराव पाटील, तातोबा यादव, दामोदर भोसले, बाळकृष्ण पाटील, रंगराव पाटील, दत्तात्रय भोसले, गजानन पाटील, राजू केसरे, दिनेश पडवळ, आण्णा पाटील, विकास चव्हाण, प्रकाश पाटील, तानाजी भोसले, विकास बालतुगे, संजय भोपळे, धनाजी पाटील, सर्जेराव दादाप्रेमी, तालुक्यातील समाजसेवक, मंडळे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *