कोल्हापूर • प्रतिनिधी
शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
किल्ले पन्हाळा येथील शिवमंदिरमध्ये पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल व शंभूराजे मंचचे अध्यक्ष सुरज ढोली यांच्यावतीने शिवमुर्तीस जलाभिषेक रुद्राभिषेक मंत्रोच्चारात करण्यात आला. तसेच पन्हाळा पंचायत समिती उद्यान येथील शिवमुर्तीस दादा नायकवडी, शंभूराजे नायकवडी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या जोतिबा डोंगर शाखेच्यावतीने शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून जोतिबा डोंगर येथे ११ वटवृक्षांची झाडे लावून विविध प्रकारच्या झाडांच्या बिया डोंगर परिसरात लावण्यात आल्या.
यावेळी शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचचे अध्यक्ष सुरज ढोली खुपिरे शाखाप्रमुख युवराज पाटील, सूर्यभान ढोली, धनंजय उपारी आदींसह सदस्य व खेळाडू उपस्थित होते.
———————————————–