विश्‍वहिंदु परिषद, बजरंग दल जिल्हा अध्यक्षपदी शशिकांत मुचंडी

Spread the love

• कार्याध्यक्षपदी प्रसाद मुजुमदार
कोल्हापूर • प्रतिनिधी
     विश्‍वहिंदु परिषद, बजरंग दल यांची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून शशिकांत मुचंडी तर कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद मुजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गिरीधर जोशी आणि बाबूभाई पटेल यांची उपाध्यक्ष म्हणून आणि अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    बजरंग दलाच्या संयोजकपदी सुरेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मातृशक्ती संयोजिका म्हणून सुनेत्रादेवी घाटगे यांची तर दुर्गावाहिनी संयोजिका म्हणून ऋतुजा जमदाडे यांची नियुक्ती केली आहे. गोरक्षा प्रमुख म्हणून संजय पाटील, मठ-मंदिर संपर्कप्रमुख म्हणून उमाकांत राणिंगा, धर्माचार्य संपर्कप्रमुख म्हणून प्रसन्न मालेकर तर समन्वय – जनसंपर्क मंचप्रमुख म्हणून राजेंद्र मकोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!