धरणगुत्ती विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शेखर पाटील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      धरणगुत्ती येथील धरणगुत्ती विकास सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये धरणगुत्ती गावचे माजी सरपंच व दत्त कारखान्याचे संचालक यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनेल बिनविरोध निवडून आले. या संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमपदाच्या निवडणुकीसाठी संस्थेच्या कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये चेअरमन म्हणून शेखर पाटील व व्हाईस चेअरमन म्हणून संजय रजपूत यांची एकमताने निवड झाली.
      या निवडीनंतर दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून चेअरमन शेखर पाटील व व्हाईस चेअरमन संजय रजपूत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नांदणी बँकेचे संचालक मलगोंडा पाटील, उद्योजक मनोहर माळी, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र लंगरे, राहुल मिस्त्री व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!