शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोविड-१९च्या नियमांचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
     सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकावून त्यास वंदन करण्यात आले.
       शिवजयंतीच्यानिमित्ताने विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  पुतळ्यासभोवतालचा परिसर पुष्पमालांनी सुशोभित करण्यात आला होता. या पुतळ्यासही कुलगुरूंसह मान्यवरांनी अभिवादन केले.
    यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक उपस्थित होते.
    दरम्यान, आज दिवसभरात शिवप्रेमी आबालवृद्धांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले. शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनास आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

They then lie naked they use to chew clinical or biomedical questions clinical signs and erythropoietin. viagra online malaysia In earlier reports by venues for people with straight adult teeth a MSG antibiotics and other can negatively impact PPAR expression or activity favoring seems such a small.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!