पानिपत मराठा शौर्यदिनी शहीद मावळ्यांना शिवसेनेच्यावतीने अभिवादन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठा साम्राज्यासाठी शौर्य गाथा मांडणारा दिवस आहे. इतिहासात नोंदविलेल्या पानिपतच्या युद्धात मराठांच्या पराभव जरी झाला असला तरी मराठा सामर्थ्याचे, धाडसाचे, शौर्याचे दर्शन या दिवशी झाले. पानिपतच्या युद्धात बलिदान देणाऱ्या शहीद मर्द मराठा मावळ्यांना शिवसेनेच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले.
    शिवसेना शहर कार्यकारिणीच्यावतीने प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, पानिपतच्या लढाईला आज २६१ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, आजही पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या मर्द मावळ्यांच्या स्मृती जपल्या गेल्या. या युद्धात मराठा साम्राज्याने सदशिवराव पेशवे आणि विश्वासराव पेशवे असे पराक्रमी गमावले. लाख बांगडी फुटल्या, दोन मोती गळाले, २७ मोहऱ्या हरवल्या. या लढाईत स्वराज्याचा प्रत्येक मावळा प्राणाची आहुती देवून लढला. ही लढाई मराठे हरले; पण मराठे युद्ध मात्र जिंकले, अशी या शौर्य दिवसाची इतिहासात नोंद झाली. अब्दालीने या लढाईचा इतका धसका घेतला, की तो परत कधीच भारतात आला नाही. हा दिवस मराठ्यांसाठी शौर्य दिवस असून, सकल मराठ्यांसाठी प्रेरणा देणारा दिवस असल्याचे सांगत पानिपत युद्धात शहीद झालेल्या मावळ्यांच्या शौर्यासमोर नतमस्तक होवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले.
      यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक राजू हुंबे, दीपक गौड, किशोर घाटगे, सुनील खोत, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, अश्विन शेळके, मंदार तपकिरे, अंकुश निपाणीकर, निलेश हंकारे, अविनाश कामते, ओंकार परमणे, दिनेश साळोखे, अभिजित कुंभार, दादू शिंदे, सचिन मांगले, रियाज बागवान, अमर क्षीरसागर, संतोष रेवणकर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!