कसबा बावड्यातील पूरग्रस्त कुटुंबांना शिवसेना मदत करणार: राजेश क्षीरसागर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     हिंदुत्वाच्या विचाराचा कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वेळोवेळी कसबा बावडा शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून, गेल्या बारा वर्षात विविध विकासकामांच्या माध्यमातून कसबा बावडा परिसराच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीच्या महापुराच्या आठवणी ताज्या असताना पुन्हा यावर्षी महापुराने कहर केला. याचा फटका कसबा बावड्यातील हजारो कुटुंबांना बसला असून, मदत नाही तर कर्तव्य या भावनेतून कसबा बावड्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबांना शिवसेनेच्यावतीने मदत करण्यात येणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. कसबा बावडा परिसरात शिवसेनेच्यावतीने शिवसहाय्य मदतीच्या वाटपास सुरवात करण्यात आली.
      कसबा बावडा येथील शिवनेरी, शिवसेना विभागीय कार्यालय येथून राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १०० कुटुंबांना शिवसहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात आले. या आठवड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने कसबा बावड्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना घरोघरी या  शिवसहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात येणार आहे.
     यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना कसबा बावडा परिसरातील भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शिवसैनिक अक्षय विजय खोत यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
      यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, विभागप्रमुख रविंद्र माने, राजू काझी, संजय लाड, उदय जाधव, गुरुदास ठोंबरे, राहुल माळी, अक्षय खोत, कपिल पोवार, विनायक बोनगे, सचिन पाटील, सचिन वावरे, दयानंद गुरव, जालिंदर पोवार, आदर्श जाधव आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!