शिवसेनेच्या संपर्क अभियानास कोल्हापूरात उद्यापासून सुरवात

Spread the love

• मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क मेळावा
कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा, असे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिले आहेत. याकरिता शिवसेनेच्यावतीने संपूर्ण राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा शिवसंपर्क मेळावा मंगळवारी ( दि.१३) दुपारी १:०० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे होणार आहे.
     गावस्तरापर्यंत संघटनेची बांधणी मजबूत व्हावी या हेतूने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले आहे. शिवसंपर्क हे जे अभियान सुरू होत आहे, या अभियानाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आणि पक्षाची बांधणी करण्यात येणार आहे. जिल्हा आणि राज्यस्तरावरचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील या अभियानाची सुरवात मंगळवारी होणाऱ्या मेळाव्यात राज्य  नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यामार्फत उपस्थित शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना पक्ष निष्ठेची आणि कर्तव्याची शपथ देवून करण्यात येणार आहे.
     सदर मेळावा सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर आदी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे. या मेळाव्यास शिवसेना, युवसेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक व युवासैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शहर कार्यकारणीच्यावतीने करण्यात आले आहे.
————————–

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!