शिवाजी-पीटीएम सामन्याची उत्सुकता शिगेला; “लिग चॅम्पियन”चा होणार फैसला

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
   फुटबॉलवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कोल्हापूरच्या फुटबॉलशौकिनांना शिवाजी – पीटीएम सामन्याबद्दल उत्कंठा लागून राहिली आहे. केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेतील “लिग चॅम्पियन”चा फैसला या सामन्यात होणार असल्याने सामन्याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सामना २४ मार्चला असला तरी त्याची चर्चा रंगली आहे.
       केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ‘शिवाजी’चे १३ तर पीटीएमचे १२ गुण आहेत. २४ मार्चला होणाऱ्या सामन्यात  ‘शिवाजी’ला विजय किंवा बरोबरी पुरेशी आहे पण पीटीएमला मात्र विजय मिळविणे आवश्यक आहे. या सामन्याच्या निकालावरून उपविजेता कोणता संघ होईल, याबाबतही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दिलबहारचे १० गुण झाले असून त्यांचा २३ मार्चला बालगोपाल विरुद्ध होणाऱ्या सामन्याचा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये दिलबहारने विजय प्राप्त केला तर उपविजेतेपदाच्या शर्यतीत येण्याची शक्यता आहे. गुण समान झाले तर कदाचित गोलफरक निर्णायक ठरेल.   
                    सातव्या फेरीतील सामने…..
• दि.२३: उत्तरेश्वर – ऋणमुक्तेश्वर
              बालगोपाल – दिलबहार
• दि.२४: पोलिस संघ – पीटीएम (ब)
              पीटीएम (अ) – शिवाजी
• दि.२५: खंडोबा (ब) – जुना बुधवार
              प्रॅक्टीस – फुलेवाडी

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!